‘ठाकरे सरकार आत्मविश्वासी नव्हे हे तर आत्मघातकी’

कोकण दौऱ्यात फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

रत्नागिरी –  देवेंद्र फडणवीस यांनी आज कोकणात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा केला आणि राज्य सरकारने भरघोस मदत करावी ही मागणी केली. तसेच गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचे पैसे अजून मिळाले नाहीत.  मोठ्या घोषणा झाल्या, पण, अजूनही त्याची पूर्तता नाही, अशी देखील टीका राज्य सरकारवर केली.

ते पुढे वृत्त माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’ठाकरे सरकार आत्मविश्वासी नव्हे हे तर आत्मघातकी सरकार आहे. मागील निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत अजून मिळालीच नाही, आता तरी मदत मिळावी, असंही ते म्हणाले आहे.

कोकणात सलग दुसऱ्या वर्षी हा दौरा आहे. कोकणाचं मोठं नुकसान झालंय, मात्र गेल्यावर्षीची काहीच मदत अजून मिळालेली नाही. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जाहीर झालेली मदत अद्याप मिळालेली नाही. काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं हे नेहमीचं झालंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, प्रारंभी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्‍यांसह नुकसान पाहणी दौर्‍याचा प्रारंभ केला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.