सोमवारी जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) गस्त पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. त्यात तीन जवानांना वीर मरण आले आहे. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाराच्या काजियाबाद भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या वाहनाचे मोठे नुकसान केले आहे.
3 CRPF personnel have lost their lives, 7 injured in terrorist attack in Handwara(J&K), CRPF officials tell ANI https://t.co/tG0NbdOgTG
— ANI (@ANI) May 4, 2020
अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी जिल्ह्यातील क्रलगुंड भागातील वंगम-काजियाबाद येथे सीआरपीएफच्या पथकावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जागीच ठार झाल्याचं त्यांनी सांगितलं. दहशतवाद्याचा शोध घेण्यासाठी परिसराला घेराव घालण्यात आला आहे. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, शनिवारी काश्मीरच्या हंदवाडा येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल आणि एका मेजरसह पाच सुरक्षा कर्मचारी शहीद झाले आहते. शहीद झालेल्यांमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका उपनिरीक्षकाचाही समावेश आहे. तर चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर हैदरला ठार केले आहे.
कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा, चंजी येथे अतिरेकी नागरिकांनी घरात ओलिस ठेवल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. माहितीच्या आधारे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पाच लष्कराचे जवान आणि पोलिसांच्या पथकाने लोकांना यशस्वीरीत्या बाहेर काढले होते. मात्र, त्याचवेळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच जावं शाहिद झाले होते.