स्टेम, इक्‍यु टेक्‍नॉलॉजीक, टीम वन आर्किटेक्‍टस संघांची आगेकूच

एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट स्पर्धा

पुणे  – स्टेम, इक्‍यु टेक्‍नॉलॉजीक, टीम वन आर्किटेक्‍टस, बुर्हानी प्रायव्हेट लिमिटेड या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून येथे सुरु असलेल्या ई2डी स्पोर्टस यांच्या तर्फे आयोजित एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत साखळी फेरीत आगेकूच केली.

ई2डी क्रिकेट मैदान, लवळे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पूल अ गटात पहिल्या सामन्यात सिवाराम मुट्यम(नाबाद 51)याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर स्टेम संघाने इनव्हेंटीज इंडिया संघावर 3 गडी राखून पराभव करून विजयी सलामी दिली. पहिल्या सामन्यात इनव्हेंटीज इंडिया संघाने 20षटकात 5बाद 166धावा केल्या. यात अमित देशपांडे 46, किरण दातार 44, पूरब गंजीकर 25यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला.

हे आव्हान स्टेम संघाने 20षटकात 7बाद 169धावा करून पूर्ण केले. यात सिवाराम मुट्यमने 29 चेंडूत नाबाद 51धावा व निकुंजने 55 धावा करून संघाचा विजय सुकर केला. सामन्याचा मानकरी सिवाराम मुट्यम ठरला. दुसऱ्या सामन्यात ब गटात दर्शन शाह(नाबाद 25 व 2-25)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इक्‍यु टेक्‍नॉलॉजीक संघाने सीसीपी संघावर केवळ 1 धावेने थरारक विजय मिळवला.

क गटात रविराज पाटील(51धावा व 2-21)याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर टीम वन आर्किटेक्‍टस ग्लोबकॉमचा 27 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली. बुर्हानी प्रायव्हेट लिमिटेड संघाने बीएमएफ संघाचा 7 गडी राखून पराभव करून आगेकूच केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.