एकेरीत परी सिंग, सॅम चावला यांना विजेतेपद

एमएसएलटीए योनेक्‍स नॅशनल सिरिज टेनिस स्पर्धा

-दुहेरीत फरहान पत्रावाला व धन्या शहा यांना विजेतेपद

-मुलींच्या गटात अपूर्वा वेमुरी व अभया वेमुरी यांना विजेतेपद

पाचगणी – रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात हरियाणाच्या परी सिंग हिने तर मुलांच्या गटात दिल्लीच्या सॅम चावला या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. दुहेरीत मुलांच्या गटात फरहान पत्रावाला व धन्या शहा यांना, तर मुलींच्या गटात अपूर्वा वेमुरी व अभया वेमुरी या खेळाडूंनी विजेतेपद पटकावले.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत 16 वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम फेरीत हरियाणाच्या तिसऱ्या मानांकित परी सिंग हिने चौदाव्या मानांकित तेलंगणाच्या अभया वेमुरीचा 6-0, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 1 तास 45मिनिटे चालला. परी हि जीडी गोएलका वर्ल्ड स्कुलमध्ये आठवी इय्यतेत शिकत असून आरके टेनिस स्टेडियम येथे प्रशिक्षक शालीन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात बाराव्या मानांकित दिल्लीच्या सॅम चावला याने अव्वल मानांकित व गुजरातच्या अर्जुन कुंडूचा 6-0, 6-3 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात फरहान पत्रावालाने धन्या शहाच्या साथीत यशराज दळवी व आकाश देब या जोडीचा 6-3, 1-6, 10-8 असा पराभव करून विजेतेपद मिळवले.

मुलींच्या गटात अपूर्वा वेमुरी व अभया वेमुरी या जोडीने पवित्रा नारीम व मेखला मन्ना यांचा 6-3, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली.

सविस्तर निकाल –

एकेरी गट – अंतिम फेरी – 16वर्षाखालील मुले: सॅम चावला (दिल्ली) (12) वि.वि. अर्जुन कुंडू (गुजरात) (1) 6-0, 6-3.

16 वर्षाखालील मुली – परी सिंग (हरियाणा) (3) वि.वि. अभया वेमुरी (तेलंगणा) (14) 6-0, 6-3.

दुहेरी गट : अंतिम फेरी: मुले: फरहान पत्रावाला/धन्या शहा वि.वि. यशराज दळवी/आकाश देब 6-3, 1-6, 10-8;

मुली : अपूर्वा वेमुरी/अभया वेमुरी वि.वि. पवित्रा नारीम/मेखला मन्ना 6-3, 6-4.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.