एमपीएफ बॉक्‍स क्रिकेट लीग स्पर्धेत 15 संघांचा समावेश

पुणे – महेश प्रोफेशन फोरम (एमपीएफ) यांच्या तर्फे “एमपीएफ बॉक्‍स क्रिकेट लीग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा राजयोग लॉन्स्‌, मार्केटयार्ड येथे 4 आणि 5 मे 2019 रोजी होणार असून या स्पर्धेत एकूण 15 संघांनी सहभाग नोंदवला आहे.

या स्पर्धेविषयी माहिती सांगताना एमपीएफ संस्थेचे संचालक अभिषेक इंदानी म्हणाले की, बॉक्‍स क्रिकेट लीग ही फारच कमी कालावधीत क्रिकेट प्रेमींमध्ये लोकप्रिय झाली आहे. आणि म्हणूनच आम्ही अशा नाविन्यपूर्ण पध्दतीचा क्रिडाप्रकार घेऊन आलो आहोत. या स्पर्धेत एकूण 15 संघ सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये 10 मुलांचे संघ आणि 5 मुलींचे संघ सहभागी आहेत. यावरूनच या बॉक्‍स्‌ क्रिकेटच्या लोकप्रियतेची कल्पना येते.

स्पर्धेचा अंतिम सामना 5 मे रोजी होणार असून स्पर्धेत एकूण 50 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रत्येक गटातील विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला करंडक देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या या स्पर्धेत प्रत्येक गटात एकूण 15 निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. मुलांच्या गटामध्ये बीएमसी फायटर्स, ओम सिस्टीम, कॉन्स्ट्रोक्राफ्ट स्मॅशर्स, केप्र मसालेदार, व्होगलाईन वॉरीयर्स, सन सुपर किंग्ज्‌, सुरोज स्मॅशर्स, आदित्य बिर्ला सर्जिकल स्ट्राईकर्स, विद्युत चॅलेंजर्स आणि शुभम वॉरीयर्स या संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.

मुलींच्या गटामध्ये बीएसएम पॉवर एन्जल्स्‌, अनुकुमार वॉंडर वुमन्स्‌, झोईरा एन्जल्स्‌, पर्व डायमंडस्‌ आणि सुरोज डायनामिक क्वीन्स्‌ हे संघ सहभागी झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.