वॉशिंग्टन – ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेतील मानाच्या समजल्या जात असलेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतून अमेरिकेची मानांकित टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने माघार घेतली आहे.
सेरेनाने गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे. सेरेनाच्या आधी रॉजर फेडरर आणि राफेल नदालनेही या स्पर्धेतून माघार घेतली आहे. सेरेनाने आतापर्यंत महिला एकेरीची 23 विजेतीपदे मिळवलेली आहेत.
तिला मार्गारेट कोर्टचा 24 विजेतेपदांचा विक्रम मोडण्यासाठी आणखी दोन विजयांची गरज आहे. मात्र, आता तिला पुढील वर्षी होत असलेल्या विम्बल्डन, ऑस्ट्रेलियन व फ्रेंच स्पर्धेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
यंदाच्या मोसमात सेरेनाने अनेक स्पर्धांतून माघार घेतली आहे. ती आता तंदुरुस्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील असून नव्या मोसमात पुनरागमन करण्याचा तिचा विचार आहे.