पॅरिस -रविवारी फ्रेंच ओपन फायनलमध्ये जोकोविच जेव्हा कोर्ट फिलीप चॅटियरमध्ये कॅस्पर रुडसमोर नेटमध्ये दिसेल, तेव्हा त्याला ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत पुरुषांच्या 23 व्या विजेतेपदाची कमाई करण्याची आस लागलेली असेल. नोव्हाक जोकोविचने रॉजर फेडरर आणि राफेल नदालच्या बरोबरीने विजेतेपद मिळवली आहेत. आता ज्यांच्याविरुद्ध खेळून नोव्हाकने 22 जेतेपदांची कमाई केली, त्यांना मागे टाकून जोकोविच नव्या विक्रमाला गवसणी घालेल, अशीच त्याची इच्छा असेल.
गेल्या वर्षी निवृत्तीची घोषणा केलेला फेडरर किंवा जानेवारीपासून दुखापतीने त्रस्त असलेला नदाल हे दोघेही रोलॅंड गॅरोस येथे अंतिम सामना पाहण्यासाठी आलेले असतील. तरीही, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की जोकोविच आता ज्या माईलस्टोनचा पाठलाग करत आहे तो त्याच्या दोन महान प्रतिस्पर्ध्यांनी अनेक प्रकारे गौरवांकित केला आहे. 2011 च्या हंगामात प्रवेश करताना, फेडररकडे 16 प्रमुख चॅम्पियनशिप होती, नदालकडे नऊ आणि जोकोविचकडे होते अवघे एक.
आता उद्या कॅस्पर रुडसमोर खेळताना जोकोविचला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. आपला लौकीक आणि विक्रमांचे पाठबळ याचा विचार करता जोकोविचला कोणतीही चूक करणे परवडणारे नाही. त्याचे चाहतेही जोकोविचच्या विक्रमी जेतेपदाची वाट पहात आहेत.
मी पुन्हा ग्रॅंडस्लॅम ट्रॉफी जिंकण्याच्या उंबरठ्यावर आलो आहे. मी खूप भाग्यवान आहे की मी गेल्या काही वर्षांत खेळलेल्या टूर्नामेंटमधील बहुतेक सामन्यांत इतिहास घडला आहे. मला खरोखर आवडत असलेल्या खेळाचा इतिहास बनण्यास सक्षम असणे हा माझा अतुलनीय विशेषाधिकार आहे आणि त्याने मला माझ्या जीवनात खूप काही दिले आहे.
– नोव्हाक जोकोविच,टेनिस खेळाडू