पॅरिस – पोलंडची व्यावसायिक महिला टेनिसपटू इगा स्वेटेक हिने यंदाच्या फ्रेंच ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला. तिने उपांत्य फेरीच्या लढतीत ब्राझीलच्या ब्रीटीझ हदाद मायाचा 6-2, 7-6 असा पराभव केला. या सामन्यात ब्रीटीझकडून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातील खेळाची अपेक्षा केली जात होती. मात्र, या वेळी तिने अपेक्षाभंग केला.
पहिल्या सेटमघ्येच इगाने आपला दर्जा सिद्ध केला व हा सेट 6-2 असा सहज जिंकला. दुसरा सेट मात्र, अत्यंत रंगतदार ठरला. या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकींच्या सर्व्हिस भेदत गुणांची कमाई केली. या सेटमध्येही 1-1, 2-2, 4-3 असी चुरस रंगली होती. मात्र, मायाकडून झालेले डबलफॉल्ट इगाच्या पथ्यावर पडले. ततने बेसलाईनवरून खेळ केला तसेच क्रॉसकोर्ट फटक्यांची रणनिती वापरत मायाला चांगेलच बेजार केले.
हा सेट एकवेळ 6-6 असा रंगतदार स्थितीत आला होता अखेर इगाने आपला अनुभव पणाला लावला व सेट 7-6(9-7) असा जिंकत सामनाही जिंकला. या विजयासासह तिने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून यात तीची लढत बलाढ्य आर्यना सबालेन्काला पराभूत केलेल्या कॅरोलिना मुशोव्हाशी होणार आहे.