अबुधाबी – स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदाल याला करोनाची बाधा झाल्याचे सोमवारी समोर आले. त्याला तातडीने विलगीकरणात पाठवण्यात आले आहे.
अबुधाबीत या आठवड्यात झालेल्या एका स्पर्धेतील सामन्यानंतर स्पेनमध्ये परतल्यावर केलेल्या करोना चाचणीत नदाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मी घरी परतलो आहे आणि माझ्या संपर्कात असलेल्यांना मला करोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले असून लवकरच यातून बरा होऊन कोर्टवर परतणार आहे, असे नदालने सांगितले.
या आठवड्यात नदाल तब्बल चार महिन्यांनंकर कोर्टवर परतला होता. येथे एका स्पर्धेत तो सहभागी झाला होता. तब्बल 20 वेळा ग्रॅंडस्लॅम विजेता असलेल्या नदालला पायाला झालेल्या दुखापतीमुळे यंदाच्या मोसमातील अनेक स्पर्धांमधून माघार घ्यावी लागली होती.