Tokyo Olympics : जोकोवीचचे गोल्डन ग्रॅंडस्लॅमचे स्वप्न भंगले

टोकियो – सर्बियाचा जागतिक अव्वल मानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीच याचे टोकियो ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंकत कारकिर्दीत गोल्डनस्लॅम साकार करण्याचे स्वप्न भंग झाले.

या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत जोकोवीचला जर्मनीच्या अलेक्‍झांडर मेदवेदेवकडून 1-6, 6-3, 6-1 असा पराभव पत्करावा लागला. या लढतीत जोकोवीचने थाटात पहिला सेट जिंकला होता. 

मात्र, त्यानंतर मेदवेदेवने त्याच्यावर वर्चस्व राखताना सलग दोन सेटसह सामनाही जिंकला. जोकोवीचने यंदाच्या मोसमात तीन ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंकत त्यानंतरच्या अमेरिकन ओपनचेही विजेतेपद मिळवत गोल्डनस्लॅम साकार करण्याचे त्याचे स्वप्न होते. 

मात्र, शुक्रवारी झालेल्या पराभवानंतर आता त्याचे हे स्वप्न भंग झाले आहे. 1988 साली जर्मनीच्या स्टेफी ग्राफने हा विक्रम साकार केला होता. त्यानंतर आजवर महिला व पुरुष गटात एकाही टेनिसपटूला ही कामगिरी करता आलेली नाही. आता ब्रॉंझपदकासाठी जोकोवीचचा सामना स्पेनच्या पाब्लो कॅरीनो बुस्टाशी होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.