Tokyo Olympics : विक्रमानंतरही साबळेचे आव्हान संपुष्टात

टोकियो  – महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 3 हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. मात्र, त्यानंतरही त्याला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही व त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

साबळेने शुक्रवारी झालेल्या शर्यतीत स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मागे टाकत नवी कामगिरी नोंदवली. त्याने ही शर्यत 8.18.12 मिनिटांत पूर्ण केली.

मात्र, त्याला दुसऱ्या हिटमध्ये सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. प्रत्येक हिटमधून पहिल्या तीन स्पर्धकांना अंतिम फेरीत प्रवेश मिळतो. त्यात पात्र होण्यात साबळे अपयशी ठरला व त्याचे आव्हान संपले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.