#Prokabaddi2019 : तेलुगु टायटन्सचा गुजरातवर विजय

अहमदाबाद – प्रो कब्बडी स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात तेलुगू टायटन्सने गुजरात फॉर्च्युन जाएंट्‌सचा 30 विरूध्द 24 अशा गुण फरकाने पराभव करत आगेकूच केली. तर या सामन्याच्या आधी झालेल्या पहिल्या सामन्यात हरयाणा स्टिलर्सने बंगळुरू बुल्सचा 33 विरुद्ध 30 गुणांनी संघर्षपूर्ण पराभव करत आगेकूच नोंदवली.

तेलुगू टायटन्स संघाकडून विशाल भारव्दाज याने सर्वाधिक 7 गुण मिळवित संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला.

दरम्यान, आज रात्री 7.30 वाजता प्रो कबड्डीमध्ये बंगाल वाॅरियर्स विरूध्द तेलुगु टायटन्स्  तर रात्री 8.30 वाजता यू.पी.योध्दा विरूध्द बंगळुरू बुल्स असे सामने होणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.