जळगाव – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मुक्ताईनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत त्यांचे उमेदवार म्हणून नाव नसल्याने नाराज झालेल्या खडसेंनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांच्या जनतेच्या समोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
यावेळी खडसे म्हणाले की, गेली चाळीस वर्षे आपण पक्षाशी प्रामाणिक राहिलो. इतर पक्षातून अनेकवेळा मंत्री पदापासून वेगवेगळी प्रलोभने आपल्याला आली. मात्र आपण पक्षाची बांधिलकी कधीही सोडली नाही. हे सगळं करून झाल्यानंतर बाहेरच्यांच्या आरोपांवरून कोणतीही चूक नसताना आपल्याला तीन वर्षापासून मंत्री पदावरून दूर केले गेले, असे खडसे म्हणाले.