Tejaswi Yadav bihar Politics : काॅंग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहूल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनंतर आता बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव आजपासून ‘जनविश्वास यात्रे’वर निघाले आहेत. २० फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत होणाऱ्या या यात्रेत तेजस्वी यादव राज्यातील विविध भागात ३२ जाहीर सभांना संबोधित करणार आहेत.
आरजेडीचे प्रवक्ते चित्तरंजन गगन यांनी सांगितले की, २० फेब्रुवारीला तेजस्वी यादव यांनी मुझफ्फरपूर येथून आपला प्रवास सुरू केला आहे. त्यांनी पहिल्या दिवशी सीतामढी आणि शिवहार येथे जाहीर सभांना संबोधित केले. बुधवारी २१ फेब्रुवारीला तेजस्वी यादव हे मोतिहारी, बेतिया आणि गोपालगंज आणि २२ फेब्रुवारीला सिवान, छपरा आणि आरा येथे पोहोचतील. | Tejaswi Yadav bihar Politics
मग बक्सर, रोहतास, औरंगाबाद, गया, नवाडा, नालंदा, जेहानाबाद, वैशाली, समस्तीपूर, दरभंगा आणि मधुबनी, सुपौल, अररिया, पूर्णिया आणि मधेपुरा तसेच सहरसा, खगरिया, मुंगेर, बेगुसराय आणि कटिहार, भागलपूर येथे जाहीर सभांना तेजस्वी यादव संबोधित करतील. | Tejaswi Yadav bihar Politics
२९ फेब्रुवारी रोजी कटिहार येथील राजेंद्र स्टेडियम आणि शाहजंगी फेअर ग्राउंड, नाथनगर, भागलपूर येथे तेजस्वी यादव जाहीर सभेला उपस्थित राहतील. त्यानंतर, १ मार्च रोजी तेजस्वी यादव चिरैया मोड, बांका, जमुई आणि लखीसराय येथे मेळाव्याला संबोधित करतील आणि पाटण्याला परततील. | Tejaswi Yadav bihar Politics
बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी तेजस्वी यादव यांच्या जनविश्वास यात्रेचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, तेजस्वी यादव यांनी आधी लूट यात्रा काढावी. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बिहारमध्ये भ्रष्टाचार करून किती संपत्ती मिळवली हे सांगायला हवे.