Faiz fazal Retirement : भारताकडून पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा फलंदाज फैज फजलने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रणजी ट्राॅफीत विदर्भ विरूध्द हरियाणा यांच्यात झालेला सामना हा त्याचा अखेरचा सामना होता. फैज हा विदर्भासाठी प्रथम श्रेणीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. याशिवाय त्याने लिस्ट ए मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.
व्हीसीए सिव्हिल लाइन्स स्टेडियमवर हरियाणा विरुद्ध रणजी ट्रॉफी सामन्याच्या चौथ्या दिवशी सोमवारी तो दोन दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या कारकिर्दीत शेवटच्या वेळी मैदानात उतरला. फैज फजलने विदर्भासाठी दोनदा ट्रॉफी जिंकली आहे.
व्हीसीए सिव्हिल लाइन्स स्टेडियमवर रविवारी जेव्हा फैज फझल विदर्भासाठी शेवटच्या वेळी फलंदाजीसाठी आला तेव्हा दोन्ही संघांनी गार्ड ऑफ ऑनर दिला. वयाच्या 18 व्या वर्षी, 17 डिसेंबर 2003 रोजी म्हणजे 21 वर्षांपूर्वी विदर्भ क्रिकेट मैदानावर त्याने पहिला रणजी सामना खेळला होता. फैजने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करताना 151 धावा केल्या होत्या.
पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा तिसरा फलंदाज…
भारतासाठी फक्त एकच एकदिवसीय सामना खेळलेला सलामीवीर फैज हा एकमेव भारतीय फलंदाज आहे ज्याने पदार्पणाच्याच सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने नाबाद 55 धावा केल्या होत्या. त्याला 15 जून 2016 रोजी एकदिवसीय कॅप मिळाली. मात्र, त्यानंतर तो कधीही टीम इंडियामध्ये दिसला नाही.
याशिवाय ऑस्ट्रेलियाचा ऍशले वुडकॉक आणि इंग्लंडच्या किम बार्नेटनंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज आहे. इंग्लंडचा बेन फॉक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा झुबेर हमझा यांनीही त्यांच्या वनडे पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत. मात्र, दोघेही सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत.
SL vs AFG : वानिंदु हसरंगाने T20I मध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा गोलंदाज…
सोशल मीडियावर शेअर केला भावनिक संदेश….
देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित करणारा फैज हा विदर्भासाठी 100 हून अधिक सामने खेळणारा एकमेव फलंदाज आहे. रविवारी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्ती जाहीर केली.
फैज याने सोशल मिडीयावर लिहले होते की, “तो आज नागपुरात कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. फझलने लिहिले, “उद्या एका युगाचा अंत होईल जेव्हा मी नागपूरच्या मैदानावर शेवटचे पाऊल ठेवेल, जिथे 21 वर्षांपूर्वी माझा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील प्रवास सुरू झाला होता. हा एक अविस्मरणीय प्रवास होता, जो प्रेमाने भरलेला होता. या आठवणी मला नेहमी लक्षात राहतील.”
24 क्रमांकाच्या जर्सीला मिस करणार फैज…
2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या सलामीच्या फलंदाजाने 137 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 9183 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने 113 लिस्ट ए सामन्यात 3641 धावा केल्या आहेत.
फजलने पुढे लिहिले की, “भारतीय क्रिकेट संघ आणि विदर्भाचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे आणि त्या क्रिकेट जर्सी घातल्याने मला नेहमीच अभिमान वाटतो. माझ्या प्रिय 24 क्रमांकाच्या जर्सीला निरोप, तुझी खूप आठवण येईल.”
फजलने पुढे लिहिले आहे की, “जसा एक अध्याय संपतो, लगेचच दुसरा वाट पाहत असतो आणि माझ्या व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीला निरोप देताना मला संमिश्र भावना येतात, मी पुढे असलेल्या नवीन साहसांना आलिंगन देण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहे.”