भुवनेश्वर : भारतीय हाॅकी संघाने प्रो-हाॅकी लीगमध्ये शनिवारी जगज्जेत्या बेल्जियमचा २-१ असा पराभव करत विजय नोंदविला. प्रो हाॅकी लीगमधील भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. याआधी भारताने पहिल्या दोन सामन्यात नेदरलँड्सचा पराभव केला होता.
FULL-TIME: Here's the moment y'all have been waiting for. 😍
We beat @BELRedLions 2-1 to continue the winning streak in #FIHProLeague. 🙌😍
🇮🇳 2-1 🇧🇪#IndiaKaGame #FIHProLeague #HockeyInvites #INDvBEL
— Hockey India (@TheHockeyIndia) February 8, 2020
कोलकाता येथील कलिंगा स्टेडियमवर ही लढत झाली. सामन्यात दुस-याच मिनिटाला भारताच्या मनदिपसिंगने मैदानी गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर, ३३ व्या मिनिटाला बेल्जियमच्या गाॅथियर बोकार्डने गोल नोंदवून संघास बरोबरी साधून दिली.
Q4 ki shuruaat aur pehle hi minute mein #TeamIndia ke paas Penalty Corner… and it's a GOOOOOAAAAALLLLLL!
Harmanpreet ki drag-flick aur Ramandeep ka last touch and we are 2-1 up. 😎🙌
🇮🇳 2-1 🇧🇪#IndiaKaGame #FIHProLeague #HockeyInvites #INDvBEL
— Hockey India (@TheHockeyIndia) February 8, 2020
त्यानंतर ४७ व्या मिनिटाला भारताच्या रमनदीप सिंहने पेनल्टी काॅर्नरव्दारे गोल करत २-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या निर्धारित वेळेत ही आघाडी भारताने कायम राखत बेल्जियमवर २-१ ने विजय साकरला.