राजगुरूनगर : राजगुरूनगर : खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आज खेड तालुक्यातील निमगाव येथे अलोट गर्दी उसळली. दर्शनासाठी मंदिराचे तिन्ही दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले करूनही मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मंदिराकडे येणाऱ्या चारही मार्गावर भाविकांना वाहतूक कोंडीला सामोरे जाणवे लागले.
दर्शनासाठी जवळपास साडेचार लाख भाविक आल्याची माहिती यात्रा कमिटीच्या अध्यक्षांनी दिली. निमगाव, खरपुडी आणि कडधे या तीन ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती.
दरवर्षी निमगाव खंडोबा येथे तीन लाखापर्यंत भाविकांची गर्दी होते. मात्र यावर्षी भावनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळी अकरा ते दोन वाजण्याच्या सुमारास मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. मंदीराचे तीनही दरवाजे खुले केले तरी गर्दी संपत नसल्याने संयोजकांना गर्दी आटोक्यात आणता आली नाही.
पुरेशी पोलीस यंत्रणा नसल्याने भाविकांना मोठा त्राससहन करावा लागला.
यामुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. तसेच गर्दीचा फायदा घेत अनेक महिला भाविकांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेल्याच्या तक्रारी यात्रा कमिटीकडे दाखल झाल्या आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. तर खेड घाटात सिमेंट वाहतूक करणारा ट्रक बंद पडल्याने सुमारे पाच ते सहा तास वाहतूक ठप्प झाली.