पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आले प्रकरण उघडकीस
मल्लपूरम (केरळ): उत्तर केरळमधल्या मल्लपूरमध्ये शाळेतल्या एका शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. त्यामुळे सातवीच्या इयत्तेत शिकणारी 12 वर्षांची विद्यार्थिनी गर्भवती राहिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षक गायब झाला आहे. वैद्यकीय चाचणीसाठी त्या विद्यार्थिनीला रुग्णालयात नेण्यात आले, त्यावेळी ती गर्भवती असल्याचे उघड झाले.
त्या विद्यार्थिनीचे शिक्षकाने जवळपास दोन महिने लैंगिक शोषण करून तिच्यावर सातत्याने बलात्कार केली. या संदर्भात पीडितेच्या कुटुंबीयांना कोणतीही कल्पना नव्हती. मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर कुटुंबीय आणि पोलिसांच्या ही बाब लक्षात आली. समुपदेशनादरम्यान त्या विद्यार्थिनीने शिक्षक वारंवार बलात्कार करत असल्याचे सांगितले. फरार आरोपी शिक्षकावर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.