Lok Sabha Election 2024 । शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची महात्मा गांधींशी तुलना करून त्यांच्या स्मारकाच्या उभारणीवरून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
दादरच्या शिवाजी पार्कमध्ये ठाकरे यांचे स्मारक प्रस्तावित आहे. हे ठिकाण सध्या मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान आहे. ठाकरे यांचे नोव्हेंबर २०१२ मध्ये निधन झाले. स्मारकाच्या उभारणीनंतर महापौरांचे निवासस्थान आता भायखळा प्राणीसंग्रहालय होणार आहे. पत्रकारांशी बोलताना देसाई यांनी, “महात्मा गांधींचे कोणतेही संवैधानिक पद नसतानाही त्यांचे स्मारक बांधले गेले, मग ते बाळासाहेबांचे का बांधले जाऊ शकत नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना नेत्याने इतरही अनेक गोष्टी सांगितल्या आहे. त्यांनी बाळ ठाकरे यांची तुलना महात्मा गांधींशी केली होती, कारण या दोघांनी कोणतेही घटनात्मक पद भूषवले नाही. देसाई पुढे म्हणाले,’महात्मा गांधी यांचे कोणतेही संवैधानिक पद नसतानाही त्यांची स्मारके उभारली जात आहेत. हे बाळासाहेबांसाठी का होऊ शकत नाही?”
मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना देसाई एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले,’लोकशाहीत आपल्या सर्वांना अधिकार आहेत. बाळासाहेब एक महान नेते आणि शिवसैनिक देखील होते. त्यांच्या सन्मानार्थ पुतळा उभारावा, अशी सर्वसामान्यांचीही इच्छा असते. तो करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यात काहीही चुकीचे नाही.’ असेही ते म्हणाले आहे. देसाईंच्या या वादग्रस्त विधानामुळे राजकारण तापले आहे.
हेही वाचा । मोदींची ऑफर शरद पवारांनी नाकारली म्हणाले,’अशा लोकांसोबत…’