चिंबळी -आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी एकविसाव्या शतकातील जीवन जगण्यासाठी आवश्यक ती कौशल्य प्राप्त व्हावीत यासाठी शाळेतील अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकातील आशय वर्तमान जीवनाशी जोडून, वर्गातील अध्यापन शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे. निष्ठा प्रशिक्षणा अंतर्गत ही कौशल्ये कशी प्राप्त करायची याचे मार्गदर्शन शिक्षकांना केले जात आहे, असे प्रतिपादन पुण्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाच्या प्राचार्या डॉ. कमलादेवी आवटे यांनी केले.
केंद्र शासनाच्या मनुष्य बाल विकास मंत्रालय यांनी विकसित केलेल्या निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम संदर्भाने खेड तालुक्यात इयत्ता 1ली ते 8वी शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. या निमित्ताने पाचव्या तुकडीच्या प्रशिक्षण वर्गास डॉ. आवटे यांनी भेट देत शिक्षकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी संजय नाइईकडे, डी.पी. मोरे, विजय दहिफळे, दयानंद शिंदे, विलास जाधव, नयना अहिरे, जितेंद्र डेरे, संदीप बोडके, प्रतिभा भांगे, निवृत्ती पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.