वडगाव मावळ – अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि. 8) ब्राम्हणवाडी (साते) हद्दीतील राणा पेट्रोल पंपाजवळ मुंबई-पुणे महामार्गावर घडली.
या घटनेची माहिती वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांना मिळताच त्यांनी वनपरिमंडल अधिकारी ज्ञानदेव ढेंबरे, वनरक्षक आशा शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शवविच्छेदन केले. वनपरीक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले म्हणाले, दोन वर्षाचा नर जातीचा तरस आहे. अन्न पाण्याच्या शोधात तरस महामार्गावर आल्याने अज्ञात वाहनाची धडक बसून तरसाचा मृत्यू झाला आहे.