सोरतापवाडी -तक्रारदार यांच्या जमीनीचे हक्कसोडपत्र व वाटप पत्राची नोंद घेण्याकरिता 40 हजासर रूपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती 20हजार रुपयांची लाच रक्कम स्विकारल्यावर सोरतापवाडी येथील तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रामकृष्ण तुळशीराम कारंडे (वय 35) असे लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे. याबाबतची माकहिती अशी की, तक्रारदाराने जमिनीचे हक्कसोडपत्र व वाटप पत्राची नोंद करण्यासाठी तलाठी कारंडे यांना सांगितले होते. त्यांनी 40 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीत 20 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाला या प्रकरणाची माहिती दिली.
मंगळवारी (दि. 7) रक्कम दिल्यानंतर कारंडे यांना सापळा लावून पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उप आयुक्त, पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.