राजगुरूनगर -खेड तालुक्यात मंगळवारी (दि. 7) सात जणांना करोनाची लागण झाली असून बाधितांचा आकडा 240वर पोहोचला आहे. खेड तालुक्यात करोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सोमवारी (दि. 6) सुमारे 40 जणांना लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात सुमारे 300 पेक्षा अधिक व्यक्ती आल्या असून प्रशासन सर्वांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाइन करीत आहे.
दम्यान, प्रशासनाकडून आता कडक धोरण राबविण्यात येत आहे तर नागरिकांमधून स्वयंस्फुर्तीने नियम पाळण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी दिवसभरात चाकण येथे 3, मरकळ येथे 2 तर शेलपिंपळगाव आणि मेदनकरवाडी येथे प्रत्येकी एक व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.
तालुक्यातील जवळपास 40 गावांमध्ये करोना पसरला असून या सर्व गावांमिळून 180 व्यक्ती आतापर्यंत करोनाबाधित झाले आहेत. राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीत 23, चाकण नगरपरिषद हद्दीत 25 तर आळंदी नगरपरिषद हद्दीत 13 व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे.
खेड तालुक्यातील राजगुरूनगर, पाईट या दोन शाखांमध्ये 10 कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत या दोन्ही शाखा पुन्हा सुरू केल्या जातील.
– गणेश थिगळे, अध्यक्ष, राजगुरूनगर सहकारी बॅंक