मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका “तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.
जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दरम्यान, तारक मेहता मालिकेतील आणखील एक लोकप्रिय पात्र म्हणजे ‘दयाबेन’ अभिनेत्री दिशा वकानीने ही महत्वाची भूमिका साकारली आहे.
पण गेल्या काही वर्षांपासून दिशा वकानी या मालिकेतून गायब झाली आहे. सप्टेंबर 2017 मध्ये तिने प्रसूती रजा घेतली. सध्या ती काय करते? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशातच दिशाचा एक फोटो समोर आला असून या फोटोत तिला ओळखणंही कठीण झालं आहे.
View this post on Instagram
दिशा वकानीच्या या फोटोने सर्वांचे लक्ष देवधून घेतले आहे. या फोटोमध्ये दिशाचा नो मेकअप लूक दिसत आहे. तसेच तिच्या मुलीला कडेवर घेऊन उभी असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, दिशाच्या या फोटोवर अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहे.
एका यूजरने दिशाच्या या फोटोवर कमेंट करत तिला सुनावले आहे. “दिशाच्या पतीने तिचे करिअर उद्धवस्त केले आहे. हे फार वाईट आहे..’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने “तुम्ही मालिकेत पुन्हा कधी दिसणार?’ असा सवाल विचारला आहे.