मुंबई – सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपट ‘गदर 2’ ने रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. तब्बल 22 वर्षांनंतर या सिक्वलमध्ये दिसलेल्या तारा सिंहची दमदार अॅक्शन पुन्हा एकदा प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. यासोबतच या चित्रपटाने आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील संसदेच्या नवीन इमारतीत दाखविण्यात येणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.
गदर 2 चित्रपटाचे शुक्रवारी सकाळी 11 वाजता नवीन संसद भवन येथे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले. यासोबतच, 26 आणि 27 ऑगस्टला रोजी देखील झी स्टुडिओने संसदेच्या नवीन इमारतीत लोकसभा सदस्यांसाठी ‘गदर 2’ चे स्क्रीनिंग आयोजित केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली.
याबाबतची माहिती देताना अनिल शर्मा यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “अनिल शर्मा प्रॉडक्शनला आजपासून नवीन संसद भवनातील बालयोगी सभागृहात सुरू होणाऱ्या ‘गदर 2’ च्या स्क्रिनिंगबाबतचा ईमेल मिळाल्याने खूप आनंद होत आहे. सदस्य आणि उपाध्यक्षांसह अनेक लोक हा चित्रपट पाहणार आहे. ‘गदर 2’च्या टीमसाठी हा खूप मोठा सन्मान आहे.
ASP is thrilled to get an email about screening #gadar2 in the new Parliament building at Balayogi auditorium for three days beginning today (August 25), for members n vice president .. n others
What an honour for Team #gadar2 🙏😊 https://t.co/RUn0PzK024— Anil Sharma (@Anilsharma_dir) August 25, 2023
या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 419 कोटींचा आकडा पार केला आणि PS-2 सह दंगल सारख्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. जगभरात या चित्रपटाने 500 कोटींचा आकडा पार केला असून लवकरच हा चित्रपट ‘पठाण’ला टक्कर देऊ शकतो. या चित्रपटाचे बजेट जवळपास 60 कोटी इतके होते.