हैदराबाद – तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुद्दुचेरीच्या राजभवनाने जारी केलेल्या निवेदनात त्यांनी या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर पद सोडल्याचीही माहिती दिली. (Tamilisai Soundararajan, Telangana Governor and Puducherry Lt. Governor, resigns to contest Lok Sabha polls)
तमिलीसाई सुंदरराजन यांची नोव्हेंबर २०१९ मध्ये तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर त्यांना फेब्रुवारी २०२१ मध्ये पुद्दुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नरचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, तामिळसाई सुंदरराजन यावेळी भाजपच्या तिकिटावर तामिळनाडूमधून निवडणूक लढवू शकतात. द्रमुक नेत्या कनिमोळी यांच्या विरोधात भाजपही त्यांना उमेदवारी देऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
सुंदरराजन यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना द्रमुक नेत्या कनिमोळी यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. २००९ मध्ये त्या चेन्नई (उत्तर) मतदारसंघातून विधानसभेच्या उमेदवार होत्या. मात्र, येथे त्यांना द्रमुकच्या टीकेएस एलांगोवनकडून पराभव स्वीकारावा लागला होता.