Sayali Sanjeev: अभिनेत्री सायली संजीव ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहचली. या मालिकमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. सायलीसह अभिनेता ऋषी सक्सेना प्रमुख भूमिकेत झळकला होता. या मालिकेच्या यशानंतर तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले. नुकतेच तिचा झिम्मा 2 हा चित्रपट सुपरहिट ठरला. या सिनेमातील सायलीच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं. त्यानंतर तिचा ‘ओले आले’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. मात्र यादरम्यान सायलीने एक मोठा निर्णय घेतला आहे.
सोशल मीडियाद्वारे सायली चाहत्यांना तिच्या नवीन प्रोजेक्टबाबत माहिती द्यायची. तसंच वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्सही ती शेअर करताना दिसत असे. त्यामुळे ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मात्र आता तिने काही काळासाठी सोशल मीडियापासून दूर होण्याचे निर्णय घेतला आहे.
Instagram पर यह पोस्ट देखें
सायली संजीवने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपला निर्णय चाहत्यांना सांगितला आहे. अभिनेत्री सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेणार आहे. याबद्दल सायली पोस्ट करत लिहिते, “सोशल मीडियापासून लहानसा ब्रेक घेत आहे. लवकरच परत येईन… लव्ह अँड लाइट” सायलीची ही इन्स्टाग्राम स्टोरीवरील पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. त्यामुळे आता काही काळ सायली सोशल मीडियावर सक्रीय नसेल.
सायलीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सायलीने’बस्ता’, ‘मन फकिरा’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘सातारचा सलमान’, ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटांत काम केले आहे. सध्या तिचा ‘झिम्मा 2’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत आहे. यातील तिच्या भूमिकेची सर्वत्र कौतुक केले जात आहे.