मुंबई – गेल्या काही दिवसांपासून साऊथ स्टार तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा एकमेकांना डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा इंडस्ट्रीमध्ये सुरु होत्या. मात्र दोघांनी आतापर्यंत याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते. मात्र आता पहिल्यांदाच तमन्नाने याबाबत सकारात्मक भाष्य केलं आहे.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा गेल्या काही काळापासून एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवत आहेत. 2023 च्या न्यू इयर पार्टीमध्ये दोघेही गोव्यात एकत्र दिसले होते. दोघेही एकमेकांना किस करताना दिसले. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगले होते. यानंतर दोघेही मुंबईत डिनर डेटवर अनेकदा स्पॉट झाले होते.यानंतर त्यांच्या लग्नाच्या अफवा देखील समोर यायला सुरुवात झाली होती.
आता तमन्ना भाटियाने आपल्या डेटिंगबाबत खुलासा केला आहे. तमन्नाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या डेटिंगबाबत सूतोवाच केला आहे. तमन्ना यावेळी म्हणते,”तुम्ही कोणत्याही को-स्टारकडे आकर्षित होत नाही. मी अनेक को-स्टार्स सोबत काम केलं आहे. जर कोणाबाबत काही फील झाले तर ते खास आहे.
लस्ट स्टोरीज 2 च्या सेटवर तुझ्या आणि विजय वर्मा मधील गोष्टी बदलल्या का ? असा प्रश्न विचारला असता तमन्ना म्हणते,”हो. तो खूप खास आहे. माझा त्याच्याशी असलेला बॉंड खूप नॅचरल आहे. तो असा आहे ज्याची मला काळजी आहे आणि मला त्याच्यासोबत आनंदी असते” असं म्हणत तमन्नाने दोघांच्या नात्याबाबत स्पष्ट दिली.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्याबद्दल गुलशन देवय्याने एका मुलाखतीत सांगितले होते, “कुछ तो है, क्या है पक्का पता नही. दोघांची केमिस्ट्री खूपच चांगली आहे. याचा अर्थ काहीतरी आहे.” तमन्ना भाटियाने पहिल्यांदाच विजय वर्मासोबतचे नाते अधिकृत केले आहे. या दोघांची जोडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.