Tamannaah Bhatia New Film| अभिनेत्री तमन्ना भाटीया तिच्या चित्रपटांसह पर्सनल लाइफमुळे देखील चर्चेत असते. तिच्या अभिनयाचे सौंदर्याचे लाखो लोक चाहते आहेत. यातच आता तमन्ना लवकरच एक नव्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तमन्ना भाटिया ‘स्पेशल ऑप्स’ फेम दिग्दर्शक नीरज पांडेच्या आगामी प्रोजेक्टमध्ये काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
तमन्ना दिग्दर्शक नीरज पांडेच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये मुख्य भूमिकेसाठी एन्ट्री करणार आहे. सध्या या चित्रपटातील कास्टबद्दल विचार केला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे शूटिंग 24 फेब्रुवारीपासून सुरू झाले असून या वर्षाच्या अखेरीस चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटाबाबत गुप्तता बाळगली जात आहे. चित्रपटाच्या सेटवरही जॅमर लावण्यात आले आहे. तसेच शूटिंगच्या पहिल्या दिवशी खूप कमी लोकं उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. Tamannaah Bhatia New Film|
तमन्ना भाटियाच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ती नुकतीच ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘जेलर’ सारख्या चित्रपटामध्ये दिसली होती. सध्या ती अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार. लवकरच तिचा ‘ओडेला 2’ चित्रटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय ती ‘अरनमानई 4’ आणि ‘वेदा’ चित्रपटात देखील दिसणार आहे. Tamannaah Bhatia New Film|
हेही वाचा:
काजल अग्रवालशी चाहत्याने केले ‘गैरवर्तन’