School Teacher Dress Code । राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांच्या दृष्टीने ‘हा’ महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शाळेतील प्रत्येक शिक्षकांसाठी आता ड्रेसकोड लागू होणार आहे. विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनाही ड्रेसकोड लागू होणार आहे. या निर्णयानुसार, शिक्षकांनाही शाळेत ठरवून देण्यात आलेले कपडे घालून यावे लागेल.
School Teacher Dress Code । राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर काय म्हणाले
‘एकाच रंगाचा ड्रेसकोड सर्व शिक्षकांनी वापरावा, शाळेत शिक्षकांनी जीन्स, टी-शर्ट वापरू नये अशा सूचना देखील सरकारकडून शाळांना देण्यात आल्या आहेत.’
School Teacher Dress Code । ड्रेसकोड लागू झाल्यावर काय होणार
‘शिक्षकांचा ड्रेसकोडचा रंग शाळा ठरवणार आहे. राज्यभरात ड्रेसकोड लागू झाल्यानंतर शिक्षकांना मनाप्रमाणे कपडे घालता येणार नाही. व्यवस्थापनाने नेमून दिलेले कपडे सर्व शिक्षकांना घालावे लागतील.
‘शिक्षकांचा ड्रेसकोडचा रंग शाळा ठरवणार आहे. राज्यभरात ड्रेसकोड लागू झाल्यानंतर शिक्षकांना मनाप्रमाणे कपडे घालता येणार नाही. व्यवस्थापनाने नेमून दिलेले कपडे सर्व शिक्षकांना घालावे लागतील.
School Teacher Dress Code । या नियमाप्रमाणे महिला शिक्षकांसाठी काय ड्रेसकोड ?
साडी अथवा सलवार-चुडीदार, कुर्ता,दुपट्टा असा पेहराव असावा.
School Teacher Dress Code । पुरूष शिक्षकांसाठी काय ड्रेसकोड ?
शर्ट-ट्राउझर पँट घालावी लागेल. त्यांच्या शर्टचा रंग फिकट तर पँटचा रंग डार्क असावा. तसेच शिक्षकांनी शर्ट इन करणे बंधनकारक असेल. शिक्षकांनी शाळेत येताना जीन्स, टी-शर्ट वापरू नये अशा सूचना देखील सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
– शिक्षकांनी कुठले बूट घालावेत, कशा चपला घालाव्यात, महिला शिक्षकांच्या चपला कशा असाव्यात याबाबत नियमावली ठरवण्यात आली आहे.