महादेव जानकर यांच्या दौऱ्यांकडे तालुक्‍याचे लक्ष

पाणीपाणी करणाऱ्यांना पाणी मिळणार का ? जनावरांच्या मुखात चारा येणार का ?

बंधारे उरमोडीच्या पाण्याने भरा !
तसेच माणगंगा नदीवरील कोल्हापूरी पध्दतीचे पळशी परिसरातील बंधारे उरमोडीच्या पाण्याने भरण्याचे गरज असुन गेल्या दहा दिवसात मनकर्णवाडी पंर्यत आलेल पाणी एका राजकारणाच्या हट्टापायी पळशी परिसरातील बंधारे भरण्यासाठी शेतकरी पाणीपट्टी भरण्यास तयार असतानाही सोडल नाही त्यामुळे शासन टॅकर वर लांखो रूपयांचा चुराडा करत असुन जनतेची पाण्यासाठी वनवण सुरू असुन साहेबांना पळशी परिसरातील बंधारे भरण्याबाबत लक्ष घालण्याची मागणी बळीराजा मधुन होत आहे.

पळशी – राज्यातील लोकसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंडळाची बैठक तातडीने घेतली. या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाय योजना करण्यासाठी चर्चा झाली. तसेच राज्यातील सर्व मंत्री महोदयानी दुष्काळी भागात जाण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार माणचे सुपूत्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर आज रविवारी 5 मे रोजी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी माणतालुक्‍याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यामुळे ते पाण्या बाबत व अन्य ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याबाबत काय निर्णय घेतात का ? शिवाय जानकर साहेब उरमोडीच्या पाण्याने पळशी परिसरातील माणगंगा नदीवरील बंधारे भरण्याबाबत काय भुमिका घेतात या बाबत त्यांच्या आजच्या दौऱ्यांकड तालुक्‍याच लक्ष लागुन राहिले आहे.

शनिवारी म्हसवड येथील चारा छावणीत मुक्काम करुन आज माण तालुक्‍यातील रविवार (दि 5) रोजी सकाळी आठ वाजता माळवाडी (वरकुटे-म्हसवड ) येथील चारा छावणीस भेट,नंतर मार्डी व गोंदवले (खु) येथे महाश्रमदानात सहभाग, दुपारी म्हसवड माणदेशी फौडेशनच्या चारा छावणीस भेट, गोंदवले बुद्रुक, वडगांव,येळेवाडी,बिजवडी,मोगराळे येथील चारा छावणीस भेट देऊन बळीराजाशी संवाद साधत दुष्काळग्रस्थांच्या आडीआडचणी समजून घेणार आहेत. या दौऱ्यांत अन्य गावात मोठ्या प्रमाणात छावण्या सुरू करण्याची मागणी होत असुन तेथे छावण्या सुरू होणार का ? टॅकरने पाणी पुरवठ्याकडे लक्ष देणार का ? गरज असलेल्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात येणार का ? याबाबत जनतेच्या नजरा जानकर साहेबांच्या दौऱ्यांकडे लागल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.