कुरकुंभ: कुरकुंभ ता.दौंड येथे अल्काईल अमाइन्स केमिकल ली.व श्री फिरंगाईमाता माध्यमिक विद्यालयाच्या वतीने श्री फिरंगाई क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे ६ वे वर्ष आहे. दौंड तालुक्यातील पहिल्या दिवशी साधारण १०० विद्यार्थी संघ या महोत्सवात सहभागी झाले आहेत.
दौंडचे तहसीलदार संजय पाटील, दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी विद्यार्थ्यांशी सवांद साधत विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून सांगितले. या क्रीडा महोत्सवामध्ये खो-खो, कब्बडी, रस्सीखेच, गोळाफेक, भालाफेक अशा विविध खेळांचा समावेश आहे.
विद्यालयात विविध तालुका, जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय स्पर्धा होत असतात यासाठी ग्रामस्थांचे नेहमीच सहकार्य लाभते असे विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब भापकर यांनी सांगितले.