Suhana Khan: बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानची लेक सुहाना खान नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तिने देखील अभिनय क्षेत्रात एंट्री घेतली. ‘द आर्चीज’ या चित्रपटातून सुहाना खानने सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर आता सुहानाने अलिबागमध्ये नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
सुहाना खानने खरेदी केलेली जमीन ही शेतजमीन असून ही अंदाजे 78,361 स्क्वेअर फूट आहे. सुहानाने अलीाबागच्या रायगड जिल्ह्यात सुमारे 9.50 कोटी रुपयांची 78,361 स्क्वेअर फूट जमीन खरेदी केली आहे. सुहानाने 13 फेब्रुवारी रोजी 57 लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरले आहेत.
सुहाना खानची आणखी एक प्रॉपर्टी
यापूर्वी सुहाना खानने अलिबागच्या थल गावात करोडो रुपयांचे शेत विकत घेतले होती. दीड एकर जागेवर 2218 चौरस फूट बांधकामही करण्यात आले आहे. या जमिनीचा व्यवहार 1 जून रोजी झाला असून त्यासाठी सुहानाने 77 लाख 46 हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. सुहानाने जून 2023 मध्ये अलिबागमध्ये 1.5 एकरमध्ये पसरलेली शेतजमीन 12.91 कोटी रुपयांना खरेदी केली होती.
सुहाना खानने ही जमीन तीन बहिणींकडून (अंजली, रेखा आणि प्रिया) विकत घेतली आहे. त्या बहिणींना त्यांच्या आई-वडिलांकडून ती जमीन वारसाहक्काने मिळाली आहे. सुहाना खानने शेत विकत घेण्यापूर्वी शाहरुख खाननेही अलिबागमध्ये एक आलिशान बंगला बांधला आहे. किंग खानचा अलिबागमध्ये समुद्रकिनारी एक बंगला आहे, ज्यामध्ये स्विमिंग पूल आणि हेलिपॅड देखील आहे.
सुहाना खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मागील वर्षी 7 डिसेंबरला तिचा ‘द आर्चीज’ हा पहिला चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट जोया अख्तरने दिग्दर्शित केला असून यात तिने वेरोनिकाची भूमिका साकारली होती.