Ankita Lokhande : यंदाच्या बिग बॉस शोमध्ये ‘पवित्र रिश्ता’ फेम अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांनी सहभाग घेतला आहे. सध्या हे जोडपे पुन्हा एकदा या शोमुळे चर्चेत आले आहे. या शोमध्ये अंकिता आणि विकीसह ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेतील नील भट्ट व ऐश्वर्या शर्मा यांनी देखील सहभाग घेतला आहे.
सध्या अंकिताचे नील आणि ऐश्वर्याशी भांडण होत आहे. त्यामुळे ती रडत असते. यावरून विकी तिला समजावत असल्याचे दाखवले आहे. मात्र अंकिताला रडताना पाहून अमृता खानविलकर देखील भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
अमृताने सोशल मीडियावर अंकितासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय तिने अंकिताचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अंकिता “मला आईकडे घरी जायचंय…” असं बोलताना दिसत आहे. त्यानंतर तिचा नवरा विकी जैन तिला समजावून सांगतो. हा व्हिडिओ शेअर करत अमृताने पोस्टमध्ये लिहिले की, “अंकिता…माझी बेबी…तू खूप खंबीर आहेस. पण, तुझ्या सध्याच्या परिस्थितीला मी चांगलंच समजू शकते. तुला खूप प्रेम अंकुडी.”
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अमृता खानविलकर एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. अंकिता आणि विकीच्या लग्नात अमृता सहभागी झाली होती. त्याचे काही फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.