तापमानवाढीची दखल घ्यावी – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली – हवामान बदल, जागतिक तापमान वाढ यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहता यावे यासाठी अशा मुद्द्यांची वैज्ञानिक आणि संशोधकांनी दखल घ्यावी, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळेच्या वैज्ञानिक आणि युवा संशोधकांना ते आज आंध्र प्रदेशातल्या तिरुपतीजवळ संबोधित करत होते.

चक्री वादळे, गारांचा पाऊस, दुष्काळ यासारख्या रूपात जागतिक तापमान वाढीचा आपल्याला फटका बसत आहे. हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे कृषी आणि अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे. प्राणी आणि वनस्पती वर्गाला अस्तित्वासाठी निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन वैज्ञानिकांनी याची दखल घ्यावी असे ते म्हणाले.

विज्ञानासाठी प्रोत्साहन देण्याची गरज

युवकांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी व्हावे या दृष्टीने राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळेने सोप्या पद्धतीने वातावरण विज्ञानाविषयी साहित्य निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले. वातावरणाविषयी अचूक अंदाज व्यकत करण्याबरोबरच हवामान बदल ते दारिद्य्र निर्मूलनासारख्या विविध आव्हानांवर उपाययोजना सुचवण्यावर वैज्ञानिकांनी लक्ष केंद्रित करावे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.