अशोक विखे, लोखंडे यांच्यावर कारवाई करा

 डॉ. विखेंच्या प्रतिनिधीची निवडणूक आयोगाकडे तक्रार

नगर –
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याबद्दल मतदारांच्या मनात कलुशित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मिडीयावर मजकूर टाकणाऱ्या अशोक विखे व नानासाहेब लोखंडे यांच्यावर भारतीय दंडविधान 1860 चे कलम जी च्या तरतुदीचा भंग केल्याच्या कारणावरुन कायदेशिर कारवाई व्हावी, अशी तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

लोखंडे यांनी 9 एप्रिल 2019 रोजी सुदाम्याने दिली कमिशनसाठी उभारी डॉ. सुजय विखे होणार पराभूत या शिर्षकाखाली सोशल मिडीयात मजकुर प्रसिध्द केला. वास्तविक पाहाता या मचकुरामध्ये ज्या गोष्टी खोट्या आहेत, खऱ्या नाहीत त्या खऱ्या आहेत, असे भासवुन मनामध्ये एखाद्या उमेदवाराबद्दल अथवा पाठीराख्यांबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याकडे निवडणूक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधल आहे. डॉ. विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचारावर व निवडणूक निकालावर विपरीत परिणाम होण्याच्या उद्देशाने निवडणूक काळात केल्या गेलेल्या आरोपांच्या विरोधात कायदेशिर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, भास्कर महांडुळे या व्यक्तिने इखे पॅटर्न 1 या शिर्षकाखाली स्वत:च्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे पगार कापुन स्वत:चे राजकारण व घर चालविताना इखे साहेब लाच कशी वाटत नाही? अशा आशयाची पोष्ट डॉ. विखे पाटील यांच्या फोटोसह प्रसारित केली आहे. तसेच सदर इसमाने इखे पॅटर्न 2 या शिर्षकाखाली आरोग्य शिबीरांचे राजकीय भांडवल करताना शिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून कोट्यवधीचे डोनेशन घेताना इखे साहेब लाज कशी वाटत नाही असाही फोटोसह प्रसारीत केलेला मजकुर हा डॉ.विखे पाटील यांची समाजामध्ये व मतदारांमध्ये प्रतिमा मलीन करण्याचा व चारित्र्य हनन करण्याच्या हेतुने प्रसारित केला. हा आदर्श आचारसंहितेचा भंग करणारा असल्याने त्यांच्या विरोधात कायदेशिर कारवाई करण्याची मागणी उमेदवाराचे प्रतिनिधी डॉ.अभिजीत दिवटे यांनी केली आहे.

डॉ. विखे पाटील यांची बदनामी करण्याच्या हेतून लोणी येथील शैलेश बाळासाहेब विखे यांनी युवा स्फुर्ती प्रतिष्ठान या व्हॉट्‌अप गृपवर मोबाईल नंबर 8412901111 या क्रमांकावरुन विखे कुटुंबियांविषयी संशय निर्माण होईल, लोकांची मने कलुशीत होईल, अशा आशयाचा चारित्र्यहनन करण्याचा मजकुर निळवंडे कृती समितीच्या व्हॉट्‌अप गृपवर शाहु आहेर पाटील यांनी मोबाईल नंबर 9011016817 तसेच अशोक एकनाथराव विखे यांनी प्रसारित केला आहे. अशा बोगस पोष्टमुळे वरिल व्यक्तिंनी आचारसंहितेमधील तरतुदींचा केलेला भंग लक्षात घेवून संबधितांना योग्य शासन व्हावे, अशी तक्रार नितीन विखे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.