“तुमची दाढी अन् केस कट करून देतो पण मत द्या” ; मत मागण्यासाठी उमेदवाराची अनोखी शक्कल, एकदा व्हिडीओ पाहाच

Tamil Nadu Lok Sabha । देशभरात लोकसभा निवडणुकाचे बिगुल वाजले आहे. उमेदवार सध्या आपापल्या मतदारसंघात प्रचारही करत आहेत. यासर्व घडामोडीत एका उमेदवाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रचारासाठी उमेदवाराने चक्क मतदाराची दाढी करून दिल्याचे दिसत आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
निवडणुकीचे वारे वाहू लागताच नेते बाहेर पडतात. आपला विजय होण्यासाठी मतदारांना वेगवेगळी आश्वासने देतात. त्याचे व्हिडीओ देखील करून व्हायरल करण्यात येतात. असाच हा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये एका उमेदवारानं मतांसाठी थेट हातात वस्तारा घेतला आहे.
अपक्ष उमेदवाराने घेतला वस्तरा हाती Tamil Nadu Lok Sabha ।
तामिळनाडूच्या रामेश्वरमध्ये लोकसभेचा अपक्ष उमेदवार एका सलूनमध्ये न्हावी म्हणून लोकांचे केस कापताना आणि दाढी करताना दिसत आहे. एका वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा उमेदवार सलूनमध्ये आलेल्या लोकांची दाढी आणि कटिंग करत त्यांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहे.
#WATCH | Rameswaram, Tamil Nadu: Parirajan, Ramanathapuram Independent candidate becomes a barber for a day during the election campaign.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/BFe19VkTpU
— ANI (@ANI) April 4, 2024
उमेदवार चक्क हात जोडून त्या व्यक्तीला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. अपक्ष उमेदवाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लिहिपर्यंत या व्हिडिओला ७३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हिडीओ तुफान व्हायरल Tamil Nadu Lok Sabha ।
या उमेदवाराचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून याआधीही अशाप्रकारच्या अनोख्या प्रचाराची उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. या व्हिडीओवर लोक भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत. काही मनोरंजनात्मक प्रतिक्रिया देत आहेत तर काहीजण अशा उमेदवारांवर टीका करत आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आज काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यातून त्यांनी पाच न्याय आणि २५ हमी दिल्या आहेत
हेही वाचा
लोकसभेपूर्वी मोठा खेळ; बिहारमध्ये झाले मोठे उलटफेर





