Pushpa 2 The Rule Poster| दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट अनेकांच्या पसंतीस पडला होता. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉगने सर्वांना वेडं लावले होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी कमाई केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर चाहते ‘पुष्पा 2 द रूल’ ची आतुरतेने वाट पाहत आहे. यातच आता अल्लू अर्जुन आणि निर्मात्यांनी ‘पुष्पा 2’ बाबत मोठी अपडेट शेअर केली आहे.
अल्लू अर्जुनने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत टीझरच्या रिलीज डेटची देखील घोषणा केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पायात घुंगरु असलेला फोटो शेअर केला आहे. यात अवतीभवती कुंकू असून आसपास खूप सारे दिवे लावलेले दिसत आहेत. याआधी सिनेमाचे काही पोस्टर आणि अल्लू फर्स्ट लूक रिलीज झाला होता. Pushpa 2 The Rule Poster|
View this post on Instagram
तसेच ‘पुष्पा 2’ मधील अल्लू अर्जुनचा लूकही चाहत्यांसमोर आला होता. निर्माते अल्लू अर्जुनच्या वाढदिवशीनिमित्त 8 एप्रिल रोजी या चित्रपटाचा टीझर रिलीज करणार आहे. तर ‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट याचवर्षी 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. सुकुमार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. Pushpa 2 The Rule Poster|
‘पुष्पा:द राइज’ या 2021 मध्ये आलेल्या सिनेमाने धुमाकूळ घातला होता. आता तीन वर्षांनी दुसरा भाग ‘पुष्पा : द रुल’ही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला. अल्लू अर्जुनला पुन्हा पुष्पाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यातच आता या पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
हेही वाचा:
डॉ. मनमोहन सिंग 33 वर्षांनंतर राज्यसभेतून निवृत्त; खरगेंनी लिहिले भावनिक पत्र