मुंबई – अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या दमदार अभिनयामुळे खास करून ओळखली जाते. अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. मात्र अभिनयासह तापसी तिच्या रागीट स्वभावामुळे देखील अधिक करून ओळखली जाते. अनेकदा ती पापाराझींच्या कॅमेरामध्ये स्पॉट झाली आणि त्यांच्यावर भडकली आहे. आता पुन्हा एकदा तापसी पन्नू पापाराझींवर संतापल्याचे पाहायला मिळाले आहे.
नुकतेच तापसी पन्नू मुंबईत स्पॉट झाली. यादरम्यान अनेक पापाराझी आणि मीडियाच्या लोकांनी तिला घेरलं आणि त्यांनी तापसीला फोटोसाठी विनंती केली. मात्र तापसी थांबली नाही आणि आपल्या कारच्या दिशेने जाऊ लागली. कारकडे जात असताना तिने ‘बाजूला सरका नाहीतर परत म्हणालं, आम्हाला धक्का दिला’, असे पापाराझींना म्हंटले. तापसीचा हाच व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, याआधी सुद्धा तापसी अनेकदा पत्रकार आणि पापाराझींवर भडकल्याचे पाहायला मिळाले आहे. यावरून अनेकदा तिला ट्रोल केले गेले आहे. मात्र त्यानंतरही तिचे पापाराझींवर संतापल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. आताही तापसीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तापसी पन्नूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख खानच्या ‘डंकी’, ‘वो लड़की हैं कहां’,’फिर आयी हसीन दिलरुबा’ आणि ‘जन गण मन’ या चित्रपटात ती दिसणार आहे. याशिवाय तापसी ‘एलियन’ या तामिळ चित्रपटात देखील दिसणार आहे.