Taapsee Pannu । बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूच्या लग्नाच्या बातम्या सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने तिचा दीर्घकाळचा प्रियकर मॅथियास बो याच्याशी गुपचूप लग्न केले आहे. मात्र, लग्न, मेहेंदी किंवा संगीत असे कोणतेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले नाही. तसेच जोडप्याकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मात्र तापसीच्या एका फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हे फोटो होळीचे असून या फोटोत तिने भांगेत कुंकू लावले आहे.
View this post on Instagram
अभिनेता अभिलाष थापलियालने होळीचा फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये तापसी आणि तिचा पार्टनर मॅथियास बो देखील दिसत आहेत. प्रत्येकजण होळीच्या रंगात रंगलेला दिसतो. पण युजर्सचे लक्ष तापसी लाल रंगाकडे जातांना दिसत आहे. यावरून लोक प्रश्न विचारत आहे.
कृष्णा सिंह नावाच्या युजरने लिहिले की, ‘भाऊ तापसीचे लग्न झाले आहे का? तर एक विचारले आहे, तापसीच्या भांगेत सिंदूर कोणी भरले? असे प्रश्न विचारत अनेकांनी तिने ‘गुपचूप लग्न’ उरकले असल्याचे म्हटले आहे.
तापसी बऱ्याच दिवसांपासून मॅथियासला डेट करत आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण होळीच्या दिवशी उदयपूरमध्ये गुपचूप लग्नकेले असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. हे जोडपे ख्रिश्चन आणि शीख रितीरिवाजानुसार लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत होते. 20 मार्च ते 23 मार्च या कालावधीत लग्नाचे विधी चालणार असल्याचे सांगण्यात येत होते. तीन दिवसांपूर्वी, तापसीचा मित्र पावेलने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये बरेच लोक आहेत आणि ते लग्नाच्या फंक्शनचे फोटो असल्याचे दिसते.