Shah Rukh Khan : गेले वर्ष बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले. याचे कारण होते शाहरुख खान. ‘पठाण’ आणि ‘जवान’ यांनी बॉक्स ऑफिसवर राज्य केले आणि भरपूर कमाई केली. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आणखी एक नाव चर्चित आले, ते नाव म्हणजे ‘डंकी’. या चित्रपटात अनेक मोठे स्टार्स दिसले होते. चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नवीन वर्षाची सुरुवात होताच सर्वांनाच शाहरुखच्या पुढच्या सिनेमाची प्रतीक्षा आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
शाहरुख खानचा ‘डंकी’ 21 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल झाला. या चित्राने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. या अनोख्या कथेने लोकांचे लक्ष वेधून घेतले. ‘डंकी’च्या एका दिवसानंतर रिलीज झालेला प्रभासचा ‘सालार’ अनेक दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सवर आला आहे. आता शाहरुख खानचा ‘डंकी’ देखील OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे.
OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर तुम्ही 1000 कोटींचा ‘पठाण’ पाहू शकता. त्याचवेळी ‘जवान’नेही जोरदार धुमाकूळ घातला. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला आहे. सर्वजण ‘डंकी’ची वाट पाहत होते. आता तुमची प्रतीक्षा संपली असून, ‘डंकी’ 9 फेब्रुवारीला ओटीटीवर येणार आहे. जिओ सिनेमाने त्याचे डिजिटल अधिकार विकत घेतल्याचे बोलले जात आहे.
दक्षिणेतील काही चित्रपट सुद्धा 09 फेब्रुवारी रोजी OTT वर प्रदर्शित होणार आहेत. यात महेश बाबूचा ‘गुंटूर करम’ आणि धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ यांचा समावेश आहे. दरम्यान, अभिनेता शाहरुख खान संजय लीला भन्साळी यांच्या ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. नंतर कळलं की त्याला रोमँटिक ड्रामा करायचा नाहीये. आता त्याला काहीतरी नवीन करायचे आहे. असं सोशल मीडिया माध्यमांतून सांगण्यात येत आहे.