Ankita Lokhande| अभिनेत्री अंकिता लोखंडेचा ‘वीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. यात तिने अभिनेता रणदीप हुड्डासोबत काम केले आहे. सध्या सोशल मीडियावर अंकिताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अंकिता पापाराझींवर संतापल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पहिल्यानंतर अनेकांनी अंकितावर टीका केली आहे.
अभिषेक कुमार आणि खानजादी जेव्हा अंकिता लोखंडेसोबत थिएटरमध्ये जात होते, तेव्हा पापाराझीही त्यांच्या मागे जात होते आणि आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी अंकिता पापाराझींनार सांगते की, “आतमध्ये फिल्म सुरू आहे. तुम्ही लोक बाहेर जा. हा योग्य मार्ग नाही. थोडा धीर बाळगा. हे सर्व काय आहे?’ असे म्हणत अंकिता आत निघून जाते. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओवर युजर्सकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. Ankita Lokhande|
View this post on Instagram
अनेकांनी अंकिताचे समर्थन केले आहे. एका यूजरने लिहिले की, ‘तुम्ही योग्य केले. पापाराझी आजकाल स्वत:ला स्टार समजू लागले आहेत. याशिवाय दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘त्यांचा राग बरोबर आहे. तर काहींनी तिच्यावर टीका देखील केली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘ओव्हर ॲक्टिंगचे दुकान.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले , ‘ हिच्या चित्रपटावर बहिष्कार टाका.’
Ankita Lokhande|
दरम्यान, ‘वीर सावरकर’ चित्रपटात रणदीप विनायक दामोदर सावरकरांची भूमिका साकारत आहे, तर अंकिता लोखंडे त्यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकरांची भूमिका साकारत आहे.