मेलबर्न : सलामीवीर शफाली वर्माच्या तडाखेबाज ४६(३६) धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी १३४ धावांचे आव्हान ठेवले आहे.
Innings Break! #TeamIndia post a total of 133 on the board. Can we defend it? #INDvNZ #T20WorldCup
Live 👉 https://t.co/PzUxm5OQ1F pic.twitter.com/ByRGCxayBJ
— BCCI Women (@BCCIWomen) February 27, 2020
न्यूझीलंडने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. त्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना शफाली वर्माच्या ४६(३४), तानिया भाटियाच्या २३(२५), राधा यादवच्या १४(९) आणि शिखा पांडेच्या नाबाद १०(१४) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ८ बाद १३३ धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडकडून गोलंदाजीत एमेली केर आणि रोजमेरी मेर यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर ली तहुहु, सोफि डिवेइन आणि लेह कैस्परेक यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.