होबार्ट – जॉर्ज मुनसेची अर्धशतकी खेळी व त्यानंतर मार्क वॅट, मायकल लिस्क आणि ब्रॅड व्हिल यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर नवख्या स्कॉटलंड संघाने येथे सुरू असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत बलाढ्य वेस्ट इंडीजवर 42 धावांनी मात करत (Scotland beat West Indies) धक्कादायक निकाल नोंदवला. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नामिबियाने श्रीलंकेचा पराभव करत असाच सनसनाटी निकाल दिला होता.
Disappointing result today in Hobart.
This now makes Wednesday’s Match 2 against Zimbabwe a must-win. #T20worldcup22 pic.twitter.com/yodqIvWrXa— Windies Cricket (@windiescricket) October 17, 2022
पहिल्यांदा फलंदाजी करताना जॉर्ज मुनसे याने धडाकेबाज नाबाद 66 धावांची खेळी केली. त्याने कॅलम मेकलॉइड 23 व मायकल जोन्स 20 यांच्या साथीने संघाला 20 षटकांत 5 बाद 160 अशी बळकट धावसंख्या उभारून दिली. वेस्ट इंडीजकडून जेसन होल्डर व अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
#T20WorldCup | ऑस्ट्रेलियात टीम इंडियावर अन्याय? पाकिस्तान संघाला ५ स्टार हॉटेल तर भारताला…
विजयासाठी आवश्यक 161 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजच्या प्रमुख फलंदाजांना अपयश आले व त्यांचा डाव 18.3 षटकांत 118 धावांवर संपला. वेस्ट इंडीजकडून होल्डरने सर्वाधिक 38 धावांची खेळी केली.
कर्णधार निकोलस पूरन, केल मायर्स, इव्हान लुईस, ब्रॅण्डन किंग, शेमार ब्रुक्स व रॉमन पॉवेल यांनी साफ निराशा केली. मायर्सने 20 धावांची खेळी केली. मात्र, स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडीजच्या दिग्गज फलंदाजांनाही अपयश आले.