सिल्वेस्टर स्टेलॉनने सेल्फिसाठी मागितले 75 हजार रुपये

हॉलिवूडमधील ऍक्‍शन स्टार असलेल्या सिल्वेस्टर स्टेलॉनच्या रॅम्बो या प्रसिद्ध चित्रपट सिरिजमधील अखेरचा चित्रपट रॅम्बो लास्ट ब्लड लवकरच प्रदर्शीत होणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशन इवेन्ट्‌समध्ये तो बिझी आहे.

प्रमोशनसाठी सिल्वेस्टर स्टेलॉन हा मॅंचेस्टर, लंडन अशा अनेक ठिकाणी जाणार आहे. यावेळी आपल्या या आवडत्या स्टारसोबत सेल्फी घेण्याची इच्छा असलेल्या चाहत्यांसाठी मात्र एक वाईट बातमी आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, सिल्वेस्टर स्टेलॉन त्याच्यासोबतच्या सेल्फीसाठी पैसे वसूल करणार आहे. त्याच्यासोबतच्या एका सेल्फीसाठी चाहत्यांना 1081 डॉलर म्हणजेच 75 हजार रूपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे चाहते कमालीचे नाराज झाले आहेत.

दरम्यान, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तिकीटही काढावे लागणार आहे. या तिकिटाचे दर 160 डॉलर होते. पण आता ही रक्कम वाढवून 1081 डॉलर करण्यात आली आहे. या पॅकेजमध्ये सिल्वेस्टरचा लाईव इंटरव्ह्यू पाहायला मिळेल. शिवाय थ्री कोर्स डिनरची मेजवानी मिळणार आहे. सोबत सिल्वेस्टरसोबत एक सेल्फीही घेता येईल. त्याचसोबत या कार्यक्रमात सिल्वेस्टरचा ऑटोग्राफ असलेल्या काही वस्तूंचा लिलावही होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.