मुंबई: प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. मागील काही दिवसांपासून तो चित्रीकरणापासून लांब आहे मात्र सध्या तो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. शाहरुखने केलेल्या एका वक्तव्याची प्रचंड चर्चा रंगली आहे. यावेळी त्याने आपल्या मुलांबाबत वक्तव्य केलं असून त्याच्या वाक्याने सर्वांना हैराण करुन सोडलं आहे.
शाहरुखला जेव्हा पहिले पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्यावेळी 1997 मध्ये शाहरुख आणि गौरीने सीमा आग्रवालच्या टाॅक शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शाहरुखने आपल्या मुलासाठी एक वक्तव्य केलं. त्यानुसार त्याच्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्स घ्यावेत अशी माझी इच्छा असल्याचे शाहरुखने म्हटले होते . मात्र या वक्तव्याची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे.
सीमा आग्रवालच्या शोदरम्यान आपल्या मुलाने सर्व गोष्टी कराव्यात ज्या आपण आपल्या तरुणपणी करु शकलो नाही, असे शाहरुखने म्हटले आहे. त्यांनी मुलींना इंप्रेस करावे, ड्रग्स घ्याव्येत तसेच सेक्स देखील करावा, अशी आपली इच्छा असल्याचे शाहरुखने म्हटले आहे.
नुकताच आर्यनने कॅलिफोर्नीयामधून त्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाहरुखने आर्यनला अभिनेता नाही तर चित्रपट निर्माता व्हायचे असल्याचे सांगितले आहे.