ऍक्टर आणि मॉडेल मिलिंद सोमण फिटनेसला किती महत्त्व देतो, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. वयाच्या 54 व्या वर्षातही त्याचा व्यायामाचा नेम चुकलेला नाही. आपल्या वर्कआऊटचे व्हिडीओ तो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. असाच एक व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. तो बघताना प्रेक्षकांना थोडावेळ टेन्शन येऊ शकते. या व्हिडीओमध्ये तो पुशअप्स मारताना दिसतो आहे.
मात्र हे सर्वसाधारण पुशअप्स नाहीत. पुशअप्स मारताना तो हातांवर जोर देऊन हवेत हात उचलतो. या प्रकाराला त्याने सुपरमॅन पुशअप्स असे नाव दिले आहे. मिलिंदची पत्ना अंकिताने या व्हिडीओला मस्तपैकी कॉमेंटही केले आहे. “असे पुशअप्स मारताना तू किती चार्मिंग दिसतो आहे.’ असे तिने म्हटले आहे. यापूर्वीदेखील मिलिंद सोमणने आपल्या पुशअप्सचा असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल केला होता.
त्यामध्ये त्याच्या पाठीवर त्याने अंकिताला बसवलेले होते. दोघांचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता. आता तर लॉकडाऊनच्या काळात असे मजेदार व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याची जणू चढाओढच सुरू झाली आहे. अशा व्यायामाच्या व्हिडिओंची क्रेझ आणखीन वाढायला लागली आहे.