बासेल – भारताचे दुहेरीतील अव्वल बॅडमिंटनपटू अश्विनी पोनाप्पा व सात्विक साईराज रांकिरेड्डी यांनी स्वित्झर्लंडमध्ये सुरू झालेल्या स्वीस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.
या जोडीने स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या हाफिज फैजल व ग्लोरिया इमॅन्युएल या जोडीवर 21-18, 21-10 अशी मात केली. ही जोडी जागतिक दुहेरीच्या क्रमवारीत आठव्या क्रमांकावर आहेत.
मात्र, या पहिल्याच सामन्यात सात्विक व अश्विनीने त्यांच्यावर संपूर्ण सामन्यात अनुभवाच्या व वेगवान सर्व्हिसच्या जोरावर मात केली व दुसरी फेरी गाठली. त्यांनी गेल्या महिन्यात झालेल्या इंडोनेशिया ओपन स्पर्धेच्या उपांत्यफेरी गाठली होती. आता ही जोडी या स्पर्धेत आणखी किती मजल मारते याकडे लक्ष लागले आहे.