पुणे – पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पाचव्या पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटिल चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात माहिका रेगे हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्वराज्यरक्षक संभाजी महाराज क्रीडा संकुल, कर्वेनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकित माहिका रेगे हिने चौथ्या मानांकित काव्या तुपेचा 6-4 असा पराभव केला.
अव्वल मानांकित काव्या देशमुख हिने सातव्या मानांकित रित्सा कोंडकरचे आव्हान 6-1 असे मोडीत काढले. दुसऱ्या मानांकित ध्रुवा मानेने श्रेया होनकनला 6-2 असे पराभूत केले.