धक्कादायक ! ‘AstraZeneca’ची लस घेतल्यानंतर दोघांचा मृत्यू

सेऊल – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशात लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. लस घेतल्यानंतर ताप येणे, अंग दुखणे अशी लक्षणे जाणवत असल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता दक्षिण कोरायात एस्ट्राजेनकाची लस घेतल्यानंतर बुधवारी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

योनहाप वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी सेऊल येथील रूग्णालयात मंगळवारी 50 रूग्णांना लस देण्यात आली होती. मृत्यू झालेला रूग्ण याच 50 जणांमधील आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, मंगळवारी 50 रूग्णांना लस देण्यात आली होती. त्यातील एका रूग्णाला लस घेतल्यानंतर दुपारी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याचा बुधवारी मृत्यू झाला. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रूग्णाचा मृत्यू हा लसीमुळेच झाला का याचा तपास सुरू आहे. या रूग्णाला मधुमेह आणि ऱ्हदयाशी संबंधीत आजार होते.

तर, दुसऱ्या एकाचा मृत्यूही करोनाची लस घेतल्यानंतर झाला. या रूग्णाला मेंदूच्या रक्तपुरवठ्याशी निगडीत आजार होता. त्यांचे वय 63 वर्ष असून ते या आजारावर उपचार घेत होते. त्यांचा करोनाची लस घेतल्यानंतर मृत्यू झाला. या रूग्णाला ताप येणे, श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यांनाही मंगळवारी उपचारासाठी रूग्णलायात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. न्यूमोनिया आणि रक्तदोषाच्या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, एस्ट्राजेनका कंपनीकडून अद्याप यावर कोणतेही भाष्य आलेले नाही. तर, डेली मेलच्या नवीन निष्कर्षानुसार, ऑक्सफर्ड-एस्ट्रजेनकाच्या लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर रूग्णलायत दाखल होण्याचे प्रमाण 90 टक्के कमी होत आहे.

याशिवाय चीनमध्येही विकसित झालेली सिनोवॅक लस घेतल्यानंतर 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहितीदेखील समोर आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.